पूर्ववैमनस्यातून थेरगावमध्ये तरुणावर कोयत्याने वार ; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

पिंपरी चिंचवड :पूर्ववैमनस्यातून तीन जणांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केल्याची घटना थेरगाव येथे रविवारी (दि.6) रात्री घडली होती. त्या घटनेतील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पंकज धोत्रे (रा. थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे.नाव आहे.त्याच्यावर देखील गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

वैभव गायकवाड, प्रथमेश शिंदे आणि मंथन चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पंकज धोत्रे आणि आरोपी याच्यात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यामुळे आरोपी मागील दोन-तीन दिवसांपासून पंकज याला शोधत होते. रविवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास पंकज थेरगाव येथील
सोळा नंबर बसस्टॉप जवळ दिसला. आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये पंकज हा गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दखल केले. मात्र उपचार सुरू असताना रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास.त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.