२२ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, लोणी काळभोर परिसरातील घटना
पुणे : २२ वर्षीय तरुणीने साडीच्या साहय्याने घराच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा येथे रविवारी (ता. ६) सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रतीक्षा चिंतामणी कुंभार (वय २२, रा. माळी-मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ती महाविद्यालयात शिक्षण घेत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंतामणी कुंभार हे एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रतीक्षाने घरातील काम उरकून घेतले. प्रतीक्षाचे वडील चिंतामणी कुंभार सकाळी सात वाजता कामाला निघून गेले. तर त्यापाठोपाठ तिची आई मंगल याही सकाळी नऊ वाजता कामाला निघून गेल्या.
प्रतिक्षाला तिच्या आईने सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास फोन केला, परंतु, ती कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नव्हती. म्हणून आईने तिथेच शेजारी राहत असलेली मोठी मुलगी प्राजक्ताला फोन करून प्रतीक्षा फोन का उचलत नाही ते पाहण्यासाठी सांगितले. दरम्यान, प्राजक्ता घरी गेल्यानंतर तिने दरवाजा वाजविला असता, घरामधून कोणतीही प्रतिसाद आला नाही. तिने घराच्या खिडकीतून पाहिले असता प्रतिक्षाने साडीच्या साहय्याने घराच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून तिला खाली घेण्यात आले होते. प्रतीक्षा आत्महत्या केल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. लोणी काळभोर पोलिस अधिक तपास करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!