घरगुती वादातून पत्नीला पेटवून पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना

सांगली :  घरगुती वादातून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून देऊन तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केला.शिवाय स्वतः कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री ३.३० वाजता भूड (ता. खानापूर) येथे घडली.

दिपाली रामचंद्र उर्फ संतोष कदम (वय ३४) असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव असून रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम (दोघेही रा. भूड) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,भूड येथील रामचंद्र उर्फ संतोष व त्याची पत्नी सौ. दिपाली यांचे गेल्या 4 दिवसांपासून घरगुती कारणावरून भांडण आहे. पत्नी दीपाली या घरात झोपल्या असताना सोमवारी रात्री साडे तीन वाजण्याच्या सुमारास पती रामचंद्र याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. त्यानंतर पत्नीच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून तिला गंभीर जखमी करत तिच्या खुनाचा प्रयत्न केला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, सागर गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत संशयित पती रामचंद्र याने घटनास्थळावरून पलायन केले. गंभीर जखमी दिपाली यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेनंतर दुपारी संशयित पती रामचंद्र याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यालाही सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची नोंद विटा पोलिसात झाली असून उपनिरीक्षक जालिंदर जाधव पुढील तपास करीत आहेत

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.