चैन स्नॅचिंग व वाहन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना अटक, गुन्हे शाखा युनिट ५ ची कामगिरी

पुणे : शहरातील विविध भागात चैन स्नॅचिंग व वाहन चोरी करणा-या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पोलीसांनी अटक केली आहे.तसेच गुन्हयातील सोने खरेदी करणाऱ्या सोनाराला देखील अटक केली आहे.त्याच्याकडून गुन्ह्यातील एकूण ५७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपींकडून ३ मोटारसायकली असा एकूण ४ लाख १३ हजार रुपायांचा माल जप्त करण्यात आला आहे.

दीपक परशुराम माळी (वय २२, रा. केशवनगर, मुंढवा) आणि मुकेश सुनिल साळुंखे (वय १९, रा. मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  चोरीचे सोने विकत घेणारे सराफ सम्राट हुकुमसिंग भाटी याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर  परिसरात चैन स्नॅचिंग व वाहन चोरी करणारे दिपक परशुराम माळी व त्याचा साथीदार मुकेश सुनिल साळुखे हेे हडपसर येथील रविदर्शन, पुणे सोलापुर रोड याठिकाणी येणार असुन त्यांचेकडे चोरीची मोटार सायकल आहे.अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पोलिसांना मिळाली.त्यानुसार सदर ठिकाणी युनिटकडील अधिकारी व स्टाफ असे सापळा लावुन थांबले. त्यावेळी बातमीप्रमाणे दोन्ही आरोपी त्यांचेकडील आर.टी.ओ. नंबर नसलेल्या होन्डा शाईन मोटार तसेच त्याच्या ताब्यात मिळालेली होन्डा शाईन मोटार सायकल ही चोरीची असुन त्याबाबत दौंड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल असुन माहे एप्रील २०२१ मध्ये सदर वाहनचोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने व त्यांनी पुणे शहर व परिसरात चेन स्नॅचिंगचे व वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना अटक करुन त्यांचेकडे तपास करता त्यांनी पुणे शहरात चतुःश्रृंगी व येरवडा पोलीस ठाणे परिसरात चोरीच्या गाडयावर व स्वतःच्या गाड्यांचा वापर करुन चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचेकडुन ०४ चेन स्नॅचिंगचे व ०१ वाहनचोरीचा असे एकुण ०५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदर आरोपीनी गुन्हा केल्यानंतर सदरचे सोने त्यांचे ओळखीचा सोनार सम्राट हुकूमसिंग भाटी यास विक्री केल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक करुन त्याचेकडुन गुन्हयातील मुद्देमाल एकुण ५७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व अटक आरोपीताकडुन ३ मोटार सायकल असा एकुण ४ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच अटक आरोपी दिपक परशुराम माळी व त्याचा साथीदार मुकेश सुनिल साळुखे यांचेवर पुर्वीचे १६ चेनचोरीचे गुन्हे दाखल असुन यातील मुकेश सुनिल साळुखे हा हडपसर पोलीस ठाणेकडील चेन स्नॅचिंगचे एका गुन्हयात बरेच दिवसांपासुन पाहिजे आरोपी आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-५ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक,हेमंत पाटील, स.पो.निरी.संतोष तासगांवकर, पोलीस अंमलदार, रमेश साबळे, आश्रुबा मोराळे, अजय गायकवाड, चेतन चव्हाण, दया शेगर, दत्ता ठोंबरे, दिपक लांडगे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, विशाल भिलारे, अमर उगले, स्वाती गावडे, स्नेहल जाधव, संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.