थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर नवनीत राणांनी खासदारकींचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात नशीब आजमावून पाहावं!

मुंबई :मुंबई उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर राजकीय प्रतिक्रियांना सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तसेच नवनीत राणा यांच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं, असा सल्ला दिला आहे.

खासदार नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलं आहे. तसेच, त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचीत जातींसाठी राखीव मतदार संघ होता. त्या मतदारसंघातून नवनीत राणा या निवडून आल्या होत्या. त्यांच्या या निवडीवर आक्षेप घेताना शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगितलं आहे.  न्यायमूर्ती धानुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने रद्द केलं. हे प्रमाणपत्र घेताना त्यांनी खोटी आणि बनावट कागदपत्र सादर केली होती असं निरीक्षण हायकोर्टांने नोंदवलं आहे.  यावर सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. त्यांना आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टोलेवजा सल्ला दिला आहे.

रुपाली चाकणकर म्हणाल्या,  “अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पण नवनीत राणा यांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर करून खासदारकी जिंकली. आज उच्च न्यायालयाने यावर जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना खरतर रिल लाईफ आणि रिअल लाईफमधील फरक माहित नाही. अभिनय क्षेत्रात तुम्हाला एखादा सीन रिटेक करता येईल. पण अमरावती जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही. कारण आपण अमरावतीच्या लाखो मतदारांचा अपमान केला आहे. तसेच राज्यघटनेचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर आपण आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं.”

काय आहे प्रकरण?

खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलं आहे. तसेच, त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचीत जातींसाठी राखीव मतदार संघ होता. त्या मतदारसंघातून नवनीत राणा या निवडून आल्या होत्या. त्यांच्या या निवडीवर आक्षेप घेताना शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं सांगितलं आहे.  न्यायमूर्ती धानुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने रद्द केलंय. हे प्रमाणपत्र घेताना त्यांनी खोटी आणि बनावट कागदपत्र सादर केली होती असं निरीक्षण हायकोर्टांने नोंदवलं आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.