रोटरीच्या वतीने भिगवण मध्ये कोरोना योद्ध्यांचा यांचा सन्मान

भिगवण (नारायण मोरे) :भिगवण कोरोना सेंटर व स्वामी चिंचोली कोरोना सेंटर येथे आज रोटरी क्लब भिगवण तर्फे जे डॉक्टर, नर्सेस,वॉर्डबॉय,सफाई कामगार ज्यांनी अहोरात्र,आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा देत आहेत आशा सर्वांचा सन्मान पत्र आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यामध्ये डॉ समीर शेख ,डॉ गणेश पवार, डॉ अमोल खानावरेे ,डॉ सुश्रुत शहा ,डॉ सुमित कारंडे, डॉ अमोल गव्हाणे,डॉ रोहित कारंडे, डॉ प्राजक्ता शिंदे, डॉ करिष्मा गोडगे ,डॉअश्विनी इंगळे,डॉ अंकिता शिंदे,डॉ खरसे चित्रा,डॉ अपर्णा शिंदे व सर्व स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भिगवण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने साहेब,रोटरी क्लब अध्यक्ष संपत बंडगर,संजय खाडे ,सचिन बोगावत, प्रदीप वाकसे ,औदुंबर हुलगे, रियाज शेख, संजय चौधरी ,किरण रायसोनी,प्रवीण वाघ,नामदेव कुदळे,रणजीत भोंगळे,वैशाली बोगावत,दिपाली भोंगळे,डॉ.अमोल खानावरे,पप्पू भोंग,अकबर तांबोळी इत्यादी उपस्थित होते.

यावेळी प्रास्तविक सचिन बोगावत यांनी केले आजच्या या कोरोना काळात आपल्या जीवाची व कुटुंबाची परवा न करता पूर्ण स्टाफ जो सेवा देत आहे त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे असे सांगितले.

माने साहेब म्हणाले की,आपल्या पोलिस स्टेशन तर्फे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले पोलीस तिथे 24 तास उपलब्ध आहेत काही गरज लागली तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

रोटरी क्लब ऑफ भिगवन तर्फे आज पर्यंत कोवीड सेंटरला साधारणतः 60 बेड ,मास्क,सॅनिटायझर, ऑक्सिजन,कॉन्सन्ट्रेटर ,पल्स ऑक्सी मिटर,बीपी मशीन,शेगडीइत्यादी साहित्य देण्यात आले,तसेच डॉक्टर व नर्सेस यांना रुग्णसेवा देत असताना ऊर्जा मिळावी म्हणून सकस आहार देण्यात आले आहेत, भिगवन कोविंड सेंटरच्या माध्यमातून भिगवण व परिसरातील गोरगरिब रुग्णांची अत्यंत उत्तम अशी सेवा होत आहे असे अध्यक्ष संपत बंडगर यांनी सांगितले.

डॉ.अमोल खानावरे यांनी आभार व्यक्त करून अशा सन्मानाने आम्हा कोविड सेन्टर मध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे मनोबल उंचावून काम करण्यासाठी अजून ऊर्जा प्राप्त होते असे सांगितले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.