आईची ५ मुलींसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या
छत्तीसगड :दारूड्या नवऱ्यासोबत वारंवार वाद होत असल्याच्या कारणावरून एका महिलेने आपल्या पाच मुलींसह बुधवारी रात्री ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना छत्तीसगड मधील महासमुंदमध्ये समोर आली आहे. या सर्वांचे मृतदेह गुरुवारी सकाळी रेल्वे ट्रॅकच्या ५० मीटर अंतरावर विखुरलेले आढलले. मृतांमधील सर्व मुलांचं वय १० ते १८ या वयोगटातील होतं. या घटनेने सर्वानांच धक्का बसला आहे.
उमा साहू (वय ४५)असे या महिलेचे नाव असून केजराम तिच्या दारुड्या पतिचे नाव आहे.अन्नपूर्णा (वय १८), यशोदा (वय १६), भूमिका (वय १४), कुमकुम (वय १२) आणि तुलसी (वय१०) असे मृत मुलींचे नावे आहे. या घटनेची कोतवाली पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मृत उमा साहू हिचा पती केजराम याला दारूचे व्यसन होते. बुधवारी संध्याकाळी तो दारू पिऊन घरी पोहोचला, तेव्हा पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. हा वाद आणखी वाढत गेल्यावर उमा संध्याकाळी ७.३० च्या सुमारास आपल्या पाच मुलीसह घराबाहेर पडल्या. त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास लिंक एक्सप्रेससमोर या सर्वांनी उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
इमलीभांठा नदीजवळ रेल्वे ट्रॅकवर गुरुवारी सकाळी लोकांनी काही मृतदेह पडलेले पाहिले. त्यानंतर त्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर रेल्वेलाही याची माहिती दिली त्यानंतर काही वेळ याठिकाणची रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!