पिंपरी चिंचवड मधील ‘स्पा सेंटर’ मध्ये भलतेच ‘उद्दोग’, पोलिसांनी ‘रेड’ टाकून केली एका मुलींची ‘सुटका’

पिंपरी चिंचवड : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पोलिसांनी  स्पा सेंटरवर छापा मारून एकाला अटक केली आहे. तसेच एका महिलेची सुटका केली.अधिक चौकशीतून या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पुढे आली. हिंजवडी पोलिसांनी बुधवारी (दि. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास म्हाळुंगे येथे ही कारवाई केली.

सुनास रचन मसी (वय ३४, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथे तीर्थ आयटी पार्कच्या मागील बाजूला स्नेवा स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी एका महिलेची सुटका केली. या महिलेकडून आरोपी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.