मुंबईतील मालवणी भागात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू

मुंबई :मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारतीचा काही भाग कोसळला आहे. मालाडच्या मालवणीमध्ये ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहे. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका  आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात ही दुर्घटना घडली. या ठिकाणी एका ३ मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या १ मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली

मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं असतानाच मालाडच्या मालवणीमध्ये रात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळली. इमारत शेजारी असणाऱ्या घरांवर कोसळली असून अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ढिगाऱ्याखाली काहीजण दबले असल्याची भीती असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश

यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकाने मृतांसह गंभीर जखमींची यादी जाहीर केली आहे.

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांची यादी

१. साहिल सर्फराज सय्यद (पु) – ९ वर्ष

२. अरिफा शेख- ८ वर्ष

३. अज्ञात (पु) – ४० वर्षे

४. अज्ञात (पु)- १५ वर्षे

५. अज्ञात (स्त्री)- ८ वर्षे

६. अज्ञात (स्त्री) – ३ वर्षे

७. अज्ञात (स्त्री) – ५ वर्षे

८. अज्ञात (स्त्री) – ३० वर्षे

९. अज्ञात (स्त्री) – ५० वर्षे

१०. अज्ञात (पु) – ८ वर्षे

११. जॉन इराना- १३ वर्ष

मालाड इमारत दुर्घटनेतील जखमी

मरी कुमारी रंगनाथ- वय वर्ष ३०

धनलक्ष्मी बेबी- वय वर्ष ५६ (प्रकृती स्थिर)

लीम शेख- वय वर्षे ४९ (प्रकृती स्थिर )

रिजवाना सय्यद- वय वर्ष ३३(प्रकृती स्थिर)

सूर्य मनी यादव- वय वर्षे ३९ (प्रकृती स्थिर)

करीम खान वय वर्ष- ३० (प्रकृती स्थिर)

गुलजार अहमद अन्सारी- वय वर्ष २६ (प्रकृती स्थिर)

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १७ जणांना आतापर्यंत सुखरुप बाहेर काढलं आहे. मात्र अद्याप अजून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. तसेच अद्याप काही जण या ढिगाऱ्याखाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या दुर्घटनेतील जखमींना कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.