मुलाची संगत चांगली नाही, तो फालतू आहेे अशी खोटी माहिती सांगितल्याने लग्नासाठी ठेवले ‘झुलवत’; ऑडिओ रेकॉर्डिंग करून केली आत्महत्या
पिंपरी : मुलाची संगत चांगली नाही, तो फालतू आहे, अशी दिशाभूल करणारी माहिती दोघांनी दिल्याने मुलीच्या वडिलांनी मुलाला स्पष्ट होकार अथवा नकार दिला नाही. यावरून मुलाने मोबाईल फोनमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करून आत्महत्या केली. ही घटना 24 एप्रिल रोजी सायंकाळी येळवंडे वस्ती, हिंजवडी येथील हॉटेल रॉयल येथे घडली.याप्रकरणी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गणेश विक्रम खराडे (वय ३२, रा. मारुंजी, ता. मुळशी), उमेश विक्रम खराडे (वय ३४, रा. मारुंजी, ता. मुळशी), तुकाराम खंडु उदमले (वय ५१, रा. चौढी, ता. जामखेडे, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लता पंजाब खराडे (वय ४७, रा. काळा खडक, वाकड, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांचा मुलगा आणि तुकाराम यांची मुलगी यांचा विवाह ठरला होता. मात्र, गणेश व उमेश यांनी उदमले यांनी फिर्यादीच्या मुलाला त्यांची मुलगी देऊ नये, यासाठी तो मुलगा व्यसनी आहे. त्याची संगत चांगल्या मुलासोबत नाही़ तो फालतू आहे, असे सांगून उदमले यांची दिशाभूल केली. त्यांच्या मनात मुलाविषयी गैरसमज निर्माण केला. त्यामुळे उदमले यांनी त्याची खातरजमा न करता गणेश व उमेश यांच्या ऐकून लग्नाविषयी स्पष्ट होकार अथवा नकार दिला नाही.
फिर्यादी यांच्या मुलाला फक्त आशेवर झुलवत ठेवले. या प्रकारामुळे मानसिक तणावात आलेल्या फिर्यादी यांच्या मुलाने २४ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता येळवंडे वस्तीतील रॉयल हॉटेल येथे आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईलवर ऑडिओ रेकॉर्डिंग केले. त्यात आरोपी व आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे. पोलीस तपासात हे रेकॉडिंग आढळून आले. त्यात मुलाच्या आत्महत्येला हे तिघे जबाबदार असल्याचे लक्षात आल्याने हिंजवडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!