आळंदी फाट्यावरील साई पॅलेस लॉजवरील वेश्या व्यवसाय उघडकीस : पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

पिंपरी चिंचवड :  खेड तालुक्यातील आळंदी फाटा येथे साई पॅलेस लॉजवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे उघड झाले आहे.यामध्ये वेश्याव्यवसाय प्रकरणी पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 10) दुपारी करण्यात आली.याप्रकरणी लॉज चालक आणि मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉज चालक सतीश कुमार शेट्टी (वय 41 रा. ठाणे), लॉज मॅनेजर सतीश गौडा (वय 35, रा. साई पॅलेस लॉज, आळंदी फाटा, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी फाटा येथे साई पॅलेस लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला  मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लॉजवर छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली आहे. आरोपींनी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला असल्याचे तपासात समोर आले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.