पुणेकरांच्या संरक्षणासाठी पोलिसांची तातडीची सेवा; जाणून घ्या “माय पुणे सेफ” अँपचे वैशिष्ट्य

पुणे : देशातील एक महत्त्वाचं शहर म्हणून पुण्याला ओळखलं जातं. मागील काही वर्षांपासून पुण्याची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. देशातील बरेच युवक शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्यात येऊन स्थायिक होतं आहे. दिवसेंदिवस विस्तार वाढणाऱ्या या शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. शहरात घडणाऱ्या घटनांची तात्काळ माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘My Pune safe’ नावाच्या अ‍ॅपची निर्मिती केली आहे.

या अ‍ॅपमुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसू शकतो, अशा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. या अ‍ॅपची पुणेकरांनाही खूप मदत होणार आहे. यासोबतचं पोलीस प्रशासना बदली अ‍ॅपची निर्मिती देखील केली आहे. या दोन्ही अ‍ॅपचे उद्धाटन नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. ‘माय पुणे सेफ’ ॲप आणि बदली सॉफ्टवेअरची निर्मिती पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, स्वप्ना गोरे, मितेश घट्टे, प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर यांसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

माय पुणे सेफ ॲपची कार्यपद्धती

पुणे शहरातील नागरिकांसाठी तसेच कोणत्याही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी पोलीसांची तात्काळ सेवा उपलब्ध होण्यासाठी पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे संकल्पनेतून पुणे शहर आयुक्तालयातील पोलीस स्टेशन कडील बिट मार्शल यांचे दैनिक गस्तीसाठी “माय सेफ पुणे” ॲप तयार करण्यात आले आहे. या  ॲपच्या सहाय्याने पोलीस स्टेशन कडील बिट मार्शल हे हद्दीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान एखाद्या घडणाऱ्या गुन्ह्यास प्रतिबंध होण्याकरीता महत्‍त्वाचे ठिकाणी भेटी देऊन किंवा कोणत्याही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी सेल्फी फोटो काढून माय सेफ पुणे ॲपमध्ये अपलोड केल्यास घटनेच्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश व वेळ नोंद होते. ॲपवरुन पोलीस नियंत्रण कक्ष पुणे शहर यांना सदरचे बिट मार्शल कोणत्या भागामध्ये गस्तीवर आहे याची माहिती मिळते. बिट मार्शलने कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी भेट दिली याची सर्व माहिती कायमस्वरुपी ॲप मध्ये उपलब्ध राहते. हे ॲप परिमंडळ चारचे पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ कार्यक्षेत्रामध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आले आहे.

बदली सॉफ्टवेअरबद्दल माहिती

बदली सॉफ्टवेअरच्या मदतीने पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासकीयदृष्ट्या परंतु  पारदर्शकपणे मनासारखी बदली मिळण्यास मदत होणार आहे. या ॲपमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, त्यांचा कार्यकाळ इत्यादीबाबींची नोंद असणार आहे. पोलीस स्थानकामध्ये समान पोलीस कर्मचाऱ्याचे बदलीने वाटप करण्यास मदत होणार आहे. यावेळी या सॉफ्टवेटरचे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी सादरीकरण करुन कार्यपद्धतीबाबतची माहिती दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.