पुणेकरांना मोठा दिलासा! सोमवारपासून मॉल्स उघडणार तर हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार 

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपासून (१४ जून) पुण्यातील सर्व मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकानं रात्री ७ वाजेपर्यंत खुली राहतील. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे.तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहतील. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाचच्या खाली आला प्रशासन लगेच निर्बंध बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे. आज (११ जून) पुण्यात अजित पवार बोलत होते.

अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉल इथे कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शहर अनलॉक केल्यानंतर ही पहिली बैठक होती. रुग्ण संख्येची परिस्थिती बघून आणखी शिथिलता देणार की निर्बंध कठोर केले जाणार याकडे लक्ष लागलं होतं. या बैठकीनंतर पुणेकरांना निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता मिळाली आहे.

पुणे शहरात आता दुकाने संध्याकाळी ७ पर्यंत उघडी राहणार आहेत. या बरोबरच हॉटेलदेखील रात्री १० पर्यंत सुरू राहतील. थिएटर तसेच हॉल ५०% क्षमतेने सुरू राहतील. तसेच अभ्यासिका ग्रंथालये देखील ५०% क्षमतेने सुरू ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवारी १४ तारखेपासून या नवीन नियमांची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. “पुढील दोन दिवस पॉझिटिव्हिटी रेट किती आहे हे पाहिलं जाईल. त्यानंतर जर हाच ट्रेण्ड कायम राहिला तर सोमवार पासून नवीन आदेशांची अंमलबजावणी होईल.”

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.