म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना सुनावलं

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सडेतोड आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. अजित पवार यांनी बुधवारी पुण्यातील पोलीस मुख्यालयाच्या कामाची पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा पाहून अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर अजित पवार यांनी थेट आयुक्तांना सुनावले.

मला बोलवायचं असेल तर चांगली काम करा, असली छा-छु काम चालणार नाही. बारामतीला येऊन बघा कशी काम केलंयं’, असा सणसणीत टोला देखील अजित पवारांनी लगावला आहे. ‘गुप्ता मला अश्या कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लई बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर हे छा- छु काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचच काम अस केलंय तर बाकीच्यांचे काय?, अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना सुनावलं आहे.  यानंतर अजित पवार यांनी पोलीस मुख्यालयात फिरून बांधकामातील त्रुटी दाखवून दिल्या. तसेच अधिकाऱ्यांना या सर्व त्रुटी सुधारण्याच्या सूचनाही दिल्या.

दरम्यान, अजित पवार यांनी कोरोना काळात योगदान दिलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार केला. कोविड काळात जे पोलीस मृत झाले त्यांच्या कुटुंबियांचा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.