वाईन शॉपचे लायसन्स देण्याच्या बहाण्याने लाखोंचा गंडा, एकाला अटक

पुणे :राज्य उत्पादन शुल्क विभागाचा तोतया अधिकारी असल्याचे सांगून वाईन शॉपचे लायसन्स देण्याच्या बहाण्याने 12 लाख रूपये घेऊन फसवणुक करणाऱ्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

शुभम नंदेश्वर शहा (वय 28, रा. तरडगाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचे वडील नंदेश्वर शहा याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण संजय खुटाळे (वय 30, रा. तुकाईदर्शन रोड, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी शुभम शहा उत्पादन शुल्क विभागात नोकरीस नसताना त्याने निरीक्षक पदावर नोकरीला आहे असे सांगत करण यांचा विश्वास संपादन केला. त्याशिवाय निरीक्षकाचा खोटा वेश परिधान करून करण यांना वाईन शॉपचे लायसन्स काढून देण्याबाबत सांगितले.

दोन्ही आरोपींनी संगनमत करून मगरपट्टा चौकातील हॉटेल तसेच हडपसर येथे वेगेवेगळया ठिकाणी रोख व ऑनलाईन स्वरूपात 12 लाख रूपये घेतले. मात्र, वाईन शॉपचे कोणतेही लायसन्स न देता त्यांची फसवूणक केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.