अवैध गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणार्या आरोपींला पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाकडून अटक, २ किलो गांजा जप्त
पिंपरी चिंचवड : अवैध गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणार्या आरोपीला पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्याकडून २ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.१) रोजी दुपारी पावणे तीन वाजता विनायकनगर, बोहाडेवाडी, मोशी येथे करण्यात आली
गणेश बारकु राख (वय २५ वर्षे रा. विनायक नगर, बोहाडेवाडी, मोशी ता. हवेली जि. पुणे )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचाविरुध्द भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुरनं ३१४/२०२१ गुंगीकारक औषधिद्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS) चे कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी परिसरातील विनायकनगर, बोहाडेवाडी येथील पूर्वेस तोंड करुन असलेल्या बिल्डींगमधील तिसऱ्या मजल्यावर फ्लॅट नंबर १२ मध्ये आरोपी गणेश राख हा स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या गांजा हा अंमली पदार्थ ताब्यात बाळगुन त्याची गि-हाईकास विक्री करत आहे. अशी माहिती सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दुपारी सापळा रचुन छापा टाकुन कारवाई केली.
सदर कारवाईत पोलीसांनी ५० हजार रुपये किमतीचा २ किलो गांजा व २ हजार ९०० रुपये रोख रक्कम असा एकुण ५२ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, पोउपनि धैर्यशिल सोळंके, पोउपनि प्रणिल चौगले, पोलीस अंमलदार विजय कांबळे, संतोष बर्गे, नितीन लोंढे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, अनिल महाजन, जालिंदर गारे, सोनाली माने यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!