सराईत गुंडास देशी पिस्टलसह अटक ; दत्तवाडी पोलीसांची कामगिरी
पुणे : ग्रामीण भागातील सराईत गुंडास दत्तवाडी पोलीसांनी देशी पिस्टलसह अटक केली आहे.त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे.
राहुल चंद्रकांत पवार (वय २६ वर्षे धंदा काहीनाही, रा. मु. पो. नसरापुर, ता. भोर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती दांडेकर पुल, पेट्रोल पंपाचे समोर, ट्रॅव्हल्सचे थांब्याजवळ, मोकळया जागेत थांबला असून त्याच्या जवळ देशी बनावटीचे पिस्टल असुन तो अपराध करण्याचे हेतुने थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण २५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपी हा पुणे ग्रामीण पोलीसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी खुनाचा प्रयत्न, अपहरण, दंगा, अग्नीशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल असुन या आरोपीवर यापुर्वी राजगड पोलीसांनी मोक्का अंतर्गत सुध्दा कारवाई केली होती. सदरचा आरोपी याच्याकडुन देखील पुणे शहर गुन्हे शाखा यांनीसुध्दा नुकतीच अग्नीशस्त्रे जप्त करुन अटक केली होती. सदरचे पिस्टल त्याने जवळ बाळगणेचा नक्की काय उद्देश होता तसेच त्याने ते काठुन मिळवले याबाबत त्याचकडे कसून चौकशी सुरु आहे. पुढील तपास पो. अं. अमित सुर्वे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. संजय शिंदे, पोलीस उप- आयुक्त सो परि. ३ मा. पौर्णिमा गायकवाड, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग पोर्णिमा तावरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलीस निरिक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील लोहार ,पो.हवा. कुंदन शिंदे,सुधीर घोटकुले, पो.अं.शरद राऊत, महेश गाढवे,अमित सुर्वे, सागर सुतकर, प्रमोद भोसले, विष्णु सुतार, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर व नवनाथ भोसले यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!