मराठा आरक्षणासाठी भिगवण मराठा महासंघाने रायरेश्वर किल्ल्यावर जाऊन घेतली शपथ

 

भिगवण (नारायण मोरे) :संपुर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाकडुन रद्द झाल्यानंतर मराठा समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे .या पार्श्वभुमीवर भिगवण येथील मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या रायरेश्वर किल्ल्यावरून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली त्या रायरेश्वर किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण करून मराठा आरक्षणासाठी शपथ घेण्यात आली. यावेळी तन-मन-धन अर्पण करून मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारची शपथ घेण्यात आली यावेळी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या तसेच छत्रपती संभाजी राजे व मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांच्या अभ्यासु मार्गदशनाखाली आरक्षणासाठी शेवटच्या श्वाशा पर्यंत लढा देऊ अशी शपथ घेण्यात आली. यावेळी रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी मराठा महासंघाचे इंदापुर तालुका अध्यक्ष राजकुमार मस्कर, छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अॅड.पांडुरंग जगताप ,डॉ.माधवराव नाईक निंबाळकर, डॉ.जयप्रकाश खरड,सुभाष राव फलफले,अशोकराव साळुंखे ,डॉ.संकेत मोरे,केशव भापकर,भरत मोरे,संजय चौधरी ,विकास वाघ,छगनराव वाळके ,उमेश डिडवळ,तुकाराम काटकर ,अनिलराव गलांडे,दत्तात्रेय जाधव,के.टी.भांडवलकर ,शरद जगदाळे,अभिनव वाघ,किरण लंगांटे,दिपक सुर्यवंशी सचिन जांभळे,संग्राम कदम,बाळासाहेब गोडसे,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.