व्हॉट्सअँप स्टेटस ठेवत 21 वर्षीय विद्यार्थ्याची स्वत:ला गोळी मारून आत्महत्या
नवी दिल्ली : एका 21 वर्षीय विद्यार्थ्याने स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना मध्यप्रदेशच्या रीवामध्ये समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला आहे. ‘आपण गेल्यावर जर कोणी रडलं तर स्वप्नात येऊन घाबरवेन’ असं देखील त्याने आपल्या स्टेटसमध्ये म्हटलं आहे. आपल्याला हसत हसत निरोप द्या असंही म्हटलं आहे. या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे. मानवेंद्र सिंह (वय 21) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानवेन्द्र सिंहने दुपारी आपल्या आई-वडिलांसोबत जेवण केलं आणि वडिलांना खाण्यासाठी फळ देऊन तो आपल्या रुममध्ये गेला. यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गोळी मारण्याचा आवाज येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांच्या रुमकडे धाव घेतली. त्यावेळ त्याने आत्महत्या केल्याचं समजलं. नातेवाईकांनी उपचारासाठी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याचा मृत्यू झाला होता. त्याने आत्महत्येआधी व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवलं होतं.
त्यामध्ये त्याने कोणीही रडलं ना तर मी खरंच स्वप्नात येऊन घाबरवेन. मी माझ्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचवण्याची स्वप्न पाहात होतो. मात्र, मी त्यांना मान खाली घालायला लावली. माझी काही चूक नाही आणि जे मी करत आहे, त्यात कोणाचाही हात नाही. प्रत्येकानं मला हसत निरोप द्या. कोणाला कधी काही चुकीचं बोललो असेल तर माफ करा. कोणीही रडलं नाही पाहिजे” असं म्हटलं आहे.एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!