हृदयद्रावक VIDEO, जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही म्हणत महाविद्यालयीन तरुणीने केली आत्महत्या

लातूर : लातूरच्या एका खाजगी महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीने एका व्हिडीओ शेअर करत आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.सोशल मीडिया वरती शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही, असं म्हणत तिने व्हिडीओ शेअर केला आहे.आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. पोलीस तपास करत आहेत.

आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव सोनू शेख असं असून तिच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ती लातूरमधील एका खाजगी महाविद्यालयात बी ए च्या द्वितीय वर्षाला शिकत होती. मृत सोनू शिक्षण घेत असतानाच पार्ट टाइम जॉब देखील करत होती. आता हे सगळं आता मला सहन होतं नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूनंतर माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, असंही सोनूनं व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

“जीवनाच्या परीक्षेत मी आणखी जास्त काळ टिकू शकत नाही. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये… मला जे कोणी जवळचे मानायचे त्यांना माझी एवढीच विनंती आहे, की त्यांनी अधून मधून माझ्या आईकडे जाऊन तिची विचारपूस करावी… कारण मी गेल्यानंतर माझ्या आईचं जगणं खूप मुश्किल होऊन बसेल” असं सोनू आपल्या व्हिडीओमध्ये म्हणत आहे.

सोनूच्या आईला कोणीतरी फोनवर बोलत होतं, यामुळे त्यांच्यात भांडणही झालं होतं. यातूनच सोनुने टोकाचा निर्णय घेतला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी लातूरच्या विवेकानंद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सुसाईड नोटचा शोध घेतला जात आहे. सोबतचं मोबाईलमध्ये आणखी काही आहे का? याचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे. सोनूने आत्महत्या केली त्यावेळी घरात कोणीच नव्हतं. तिची आई कामावर गेली होती, तर वडील विभक्त राहत असल्याने तेही घरात नव्हते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.