अक्कलकोटमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून; ६ जणांना अटक

अक्कलकोट :अक्कलकोट तालुक्यातील ममनाबाद येथे पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर पाठीत वार करून भरदिवसा गावात निघृण खून करण्यात आला असून सोडविण्यास आलेले पाचजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. ही घटना शनिवारी (१२ जून) साडेपाच वाजता घडली.  याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाजणांना अटक करण्यात आली आहे.

विश्वनाथ बसण्णा पाटील (वय ३२) असे निघृण खून झालेल्या तरुणाचे नाव असून, सिद्धराम हणमंत पाटील, रामचंद्र हणमंत बिराजदार, अजय बिराजदार व संजय बिराजदार अशी जखमींची नावे आहेत. तर, चंद्रकांत मसण्णा गायकवाड, धोंडिबा मसण्णा गायकवाड, मसण्णा धोंडिबा गायकवाड, अंबादास शंकर कोळी, लिंगप्पा शंकर कोळी, सूर्यकांत शंकर कोळी, बलभीम शंकर कोळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

विश्वनाथ पाटील याचा गावातीलच गायकवाड व कोळी कुटुंबांसोबत काही दिवसांपासून वाद सुरू होता. गावातील दुकानदार रामचंद्र बिराजदार व उपसरपंच कोळी यांच्यात धान्य वाटपावरून दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. दुपारी विश्वनाथ पाटील व वरील आरोपींमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातून आरोपींनी विश्वनाथ पाटीलवर कुऱहाड व तलवारीने वार केले. हे भांडण सोडविण्यासाठी आलेले सिद्धराम पाटील, रामचंद्र बिराजदार, अजय बिराजदार व संजय बिराजदार यांच्यावरही हल्ला करण्यात आला. यात ते सर्व जखमी झाले आहेत.तसेच तिथे थांबलेल्या स्विफ्ट गाडीचे नुकसान केले आहे, अशी सिद्धाराम हणमंत पाटील यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या घटनेची नोंद शनिवारी रात्री उशिरा दाखल झाली. दुसरी बाजू चंद्रकांत गायकवाड यांनी देखील विश्वनाथ पाटील ,संजय बिराजदार, सिध्दप्पा पाटील व अन्य तीन अनोळखी व्यक्ती विरोध कु-हाडी व तलवारीने मारुन जातिवाचक शिवागाळी करत जीव मारण्याची धमकी दिल्याबाबत फिर्याद दिली आहे. या घटनेतील सर्व जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून गंभीर जखमी असलेले संजय बिराजदार (वय २१ ) यांना सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार व पोलीस कर्मचारी घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत. यातील ३०२ कलमातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.