आईचा विरह सहन न झाल्याने व्हॉट्सअॅपवर आईचे छायाचित्र स्टेटस ठेवत तरुणाची गळफास लावून आत्महत्या

नागपूर : कोरोनाकाळात आईचा हृदयविकाराने मृत्यू झाला. हे दुःख पचविणे सहन न झाल्याने २३ वर्षीय मुलाने “मला आईची सेवा करायची आहे”, अशा आशयाची चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी एमआयडीसीतील साईनगर येथे उघडकीस आली.

रोशन सुनील जारोडे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.आत्महत्येपूर्वी रोशन याने व्हॉट्सॲपवर आईचा फोटो व ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिखारी’ said everyone in your life will have last day with you and yo don,t even know when it will be literally felt that असे मेसेज टाकले होते. मृत्यूपूर्वी त्याने आईच्या फोटोवर ताज्या फुलांचा हार चढविला होता.

रोशन याचे बीईपर्यंत शिक्षण झाले. त्याची आई मेस चालवून संसाराचा गाढा ओढायची. काबाडकष्ट केल्यानंतर पैपै शिल्लक पाडून दोन वर्षांपूर्वी साईनगरात घर घेतले. घरी दोन भाडेकरू आहेत. एक महिन्यापूर्वी कोरोनाकाळात हृदयविकाराने रोशनच्या आईचे निधन झाले. त्यामुळे तो नेहमीच तणावात राहायला लागला. चार दिवसांपूर्वी तो मामाकडे गेला. रविवारी दुपारी घरी परतला. त्याने काकालाही घरी परतल्याचे सांगितले.

सायंकाळी रोशन याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी रोशन याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. ‘मला माझ्या आईची सेवा करायची आहे. मला आता जगणे शक्य नाही. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही. माझी मोटारसायकल नातेवाइकाला द्यावी’, असे चिठ्ठीत लिहिले आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली असून, एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली व तपास सुरू केला.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.