पुण्यात टोळक्याकडून कोयत्याने सपासप वार करून अल्पवयीन मुलाचा खून

पुणे : पुणे शहरातील दत्तवाडी भागात सात ते आठ जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार करून एका अल्पवयीन मुलाचा खून केल्याची घटना काल (दि.१३) रात्री घडली. हा घटनेमुळे दत्तवाडी परिसर हादरला आहे.

सौरभ तानाजी वाघमारे (वय १८) असे खुन झालेल्याचे नाव आहे.याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत सौरभ याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे.

मिळालेल्या माहीतीनूसार,रात्री नऊ वाजताच्या सुमारास पर्वती पायथा परिसरात ७ ते ८ जणाच्या टोळक्याने सौरभ याला पकडले. त्यानंतर हत्याराने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली.घटनेनंतर टोळके पसार झाले आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. दरम्यान खून करण्यामागचे कारण समजू शकले नाही.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.