डीझेल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जेरबंद
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदूर येथील एका कंपनी समोर पार्किंगमधील ५ ट्रकमधून ८३ हजार रुपये किमतीचे डिझेल चोरी करणार्या टोळीतील सहा आरोपीला ग्रामीण पोलिसांच्या स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.
दत्ता विनोद रणधीर (वय २२ वर्षे रा दत्तवाडी उरुळी कांचन ता.हवेली जि. पुणे), राहुल उर्फ दगड्या मारुती मदने (वय २७ वर्षे रा दत्तवाडी उरुळी कांचन ता.हवेली जि. पुणे), वैभव राजाराम तरंगे (वय १९ वर्षे रा दत्तवाडी उरुळी कांचन ता.हवेली जि. पुणे), प्रतीक बन्सीलाल तांबे (वय २६ वर्षे रा दत्तवाडी उरुळी कांचन ता.हवेली जि. पुणे), स्वरूप विजय रायकर (वय २३ वर्षे रा सूर्यवंशी मळा ,अष्टापुर फाटा ता.हवेली जि. पुणे), धर्मेंद्र कुंडलिक टिळेकर (वय ३४ वर्षे रा टिळेकर वाडी ता. हवेली जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवत पोलिस ठाण्याच्या पोलिस हद्दीतून बुधवारी (ता. ०९ ) मध्यरात्री नांदूर येथील एका कंपनी समोर पार्किंग केलेल्या ५ ट्रक मधुन सुमारे ८३ हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरीस गेले होते. तसेच शुक्रवारी (ता. ११ ) पारगाव येथील एका ट्रक मधून २५ हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरीस गेल्याची तक्रार यवत पोलिस ठाण्यात दिली होती. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सुरू केला असता मिळालेल्या माहितीच्या आदरे गुन्ह्याचा तपास करीत असताना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, उरुळी कांचन व परिसरातील काही संशयित इसम हे डिझेल चोरी करीत असल्याची माहिती मिळाली. या मिळालेल्या माहितीच्या आधारे उरुळी कांचन परिसरातील दत्तवाडी या ठिकाणी जाऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला व वरील नावे असेलेल्या आरोपींना ताब्यात घेतले.दरम्यान, आरोपींकडे चौकशी केली असता दोन चारचाकी गाडीतून बाहेर पडून वरील दोन्ही ठिकाणी डिझेल चोरी केल्याची कबूली आरोपींनी दिली तसेच अधिक चौकशी केली असता गुन्हा करतेवेळी एक सॅमसंग कंपनी चा मोबाईल देखील चोरून नेला होता.
त्याच्याकडून ८० हजार रुपये किमतीची मारुती सुजूकी कंपनीची अल्टो कार, ४ लाख रुपये किंमतीची मारुती सुजूकी कंपनीची इर्तीगा कार व १० रुपये किमतीचा गुन्ह्यातील चोरीस गेलेला सॅमसंग कंपनीचा j2 मोबाईल असा एकूण ४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी आणि सदरचा मुद्देमाल पुढील तपास कामी यवत पोलिस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, दौंड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पोलिस नाईक विजय कांचन, राजु मोमिन, पोलिस हवालदार, अभिजित एकशिंगे, अमोल शेडगे, मंगेश भगत, धिरज जाधव, पूनम गुंड, दगडू विरकर यांचे पथकाने केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!