श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचा 3रा वर्धापनदिन व जागतिक रक्तदान दिन भिगवण कोविड सेंटरमध्ये साजरा!

 

भिगवण (नारायण मोरे) :महाराष्ट्रामध्ये रक्तदान क्षेत्रात युवकांना घेऊन रक्तदानाची चळवळ उभी करण्याच्या हेतून व गरजू रुग्णांना मोफत रक्ताची बॅग उपलब्ध करून देण्याच्या हेतून 14 जून 2018 साली संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांनी युवकांच्या साथीने इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीमधून शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली, आज बघता बघता 3 वर्ष रक्तदानाच्या चळवळीला 3 वर्ष पूर्ण झाले.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या5 माध्यमातून 30,000 च्या पुढे रक्तदाते, 450 च्या पुढे रक्तदान शिबिरे व 750 च्या पुढे मोफत बॅग अश्या प्रकारे काम चालू असून पुणे, सोलापूर, उमरगा, इंदापूर, बारामती, सातारा, उस्मानाबाद, तुळजापूर, कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या एकजुटीने पार पाडता आले असे यावेळी भूषण5 सुर्वे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या 3 ऱ्या वर्धापन दिनाचे व 14 जून जागतिक रक्तदान दिवसाचे औचित्य साधून भिगवण कोविड सेंटर येथे शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 12 डजन बिस्कीटपुढे व पौष्टिक आहार यावेळी रुग्णांना व सर्व स्टाफ आणि डॉकटर्स यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. व 3 ऱ्या वर्धापनदिन कोविडच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत केक कापून साजरा करण्यात आला.
डॉ समीर शेख, डॉ गणेश पवार, डॉ व्यवहारे, भारतीय जैन संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन शेठ बोगावत, शिवशंभू ट्रस्ट चे इंदापूर तालुका अध्यक्ष मनोज आण्णा राक्षे, शिवशंभू ट्रस्ट संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे, भिगवण शहर अध्यक्ष सुरज पुजारी, सदस्य अजय पवार, किशोर फलके, सनी शेलार व कोविड हॉस्पिटल स्टाफ यावेळी उपस्थित होता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.