सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाकडून अटक
पुणे : सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली आहे.प्रणित ऊर्फ पन्या राजेश रंगारी (वय- २४ वर्षे, रा. हरिहरेश्वर कॉम्प्लेक्स, पारी कंपनीजवळ, न-हे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला आरोपी प्रणित ऊर्फ पन्या हा नवले ब्रिज, वडगाव, पुणे येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दाखल गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाईकरीता सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्तअमिताभ गुप्ता, पोलीस सह- आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख यांचे मार्गदर्शनाखालील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्रीमती.शिल्पा चव्हाण, सहा.पोलीस निरीक्षक,जुबेर मुजावर,.सहा.पोलीस फौजदार शाहिद शेख, पोलीस अंमलदार गणेश पाटोळे, श्रीकांत दगडे व ऋषिकेश कोळप दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे पथकाने केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!