अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक, 22 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त
पुणे : अंमली पदार्थ विक्री करणा-या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकच्या पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख 32 हजार किंमतीचे 22 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे.
प्रसन्न बाळासाहेब शिंदे (वय 22, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) व सौरभ लहु उंबरे (वय 21, रा. साईनगर, हिंगणे खुर्द, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वडगांव बुध्रुक येथील विद्या सहकारी बँक सिंहगड रोड शाखेचे समोरील सार्वजनिक रोडवर ,पो.निरीक्षक विनायक गायकवाड हे स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना आरोपी प्रसन्न शिंदे याच्या जवळ 90 हजार किंमतीचे 15 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थ, दोन मोबाईल, मोफेड, 6 हजार 200 रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख 26 हजार 200 रुपये किमतीचा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळाला. आरोपी प्रसन्न शिंदे याने हा अंमली पदार्थ त्याचा मित्र सौरभ उंबरे याच्याकडून विक्रीसाठी घेतला होता अशी माहिती त्याने दिली.पोलिसांनी आरोपी सौरभ उंबरे याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कडून 42 हजार रुपये किमतीचे 7 ग्रॅम मेफेड्रॉन(एम.डी.) अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेले आहे.
या दोन्ही आरोपींकडून 1 लाख 32 हजार किंमतीचे 22 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेले आहे अटक आरोपी उंबरे हा सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
सदरची कारवाई कारवाई ही पोलीस आयुक्त.पुणे शहर अमिताभ गुप्ता,पोलीस सह-आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहा पो
आयुक्त,गुन्हे १ सुरेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सपोनि लक्ष्मण ढेंगळे व पोलीस अंमलदार प्रविण शिर्के, सुजित वाडेकर, संदिप जाधव, राहुल जोशी, विशाल शिंदे, मारुती पारधी, रुबी हम, रेहना शेख, प्रविण उत्तेकर, मनोज साळुके, नितीन जाधव, रमेश पवार, संदेश काकडे, योगेश मोहिते यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!