पिंपरी चिंचवड पोलिसांचा पॅटर्नच वेगळा ! ऑटो रिक्षांची तोडफोड केलेल्या आरोपांची काढली गावभर धिंड

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहनांची तोडफोड झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यातच वाकड परिसरात दोन ते तीन दिवसांपूर्वी म्हतोबा नगर झोपडपट्टीसमोर जवळपास 13 मालवाहक ऑटो रिक्षांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली होती. या संतापजनक प्रकारानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. तसेच या गुंडाच्या टोळक्याची परिसरातील दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. कॉम्प्लेक्सच्या समोर रिक्षा उभी करत असल्याने तो हे कृत्य केल्याच समोर आलं होतं. याप्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे

मुख्य आरोपी सुरक्षा रक्षक किरण घाडगे, सागर घाडगे, चंद्रकांत गायकवाड, मयूर अडागळे, अविनाश नलावडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हातोबा नगर वाकड येथे 13 रिक्षांची तोडफोड करणाऱ्या किरण घाडगेसह पाच जणांची वाकड पोलिसांनी त्याच परिसरात धिंड काढली आहे. संबंधित आरोपींना धडा शिकवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी धिंड काढली असल्याचं वाकड पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

नेमकं घडलं काय?

वाकड परिसरातील म्हातोबानगर येथे नवीन कॉम्प्लेक्स बांधण्यात आले असून त्याच्या समोर तेथील काही रिक्षा चालक वारंवार बजावून देखील रिक्षा उभी करतात. याशिवाय त्यातील काहीजण त्या ठिकाणी लघुशंका देखील करायचे. याचा राग मनात धरून गुरुवारी मध्यरात्री आरोपीने मद्यपान करून कॉम्प्लेक्स समोर उभा करण्यात आलेल्या रिक्षा दगडाने फोडून नुकसान केले होते.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.