जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत आरोपींना अटक, गुन्हे शाखेच्या युनिट 2 ची कामगिरी

पुणे : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत आरोपींना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकांने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणत पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

संजय उर्फ सोन्या हरिष भोसले (वय 21,रा. हंडेवाडी) व पुरुषोत्तम उर्फ बंड्या राजेंद्र वीर (वय 25, रा. नादेडफटा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथे घडलेल्या जबरी चोरी प्रकरणातील आरोपी हे ससाणेनगर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोन मधील पोलीस नाईक चेतन मोरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने येथे सापळा लावून त्यांना पकडले. तर त्यांच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन सखोल तपास केल्यानंतर त्यांनी हडपसर, सिंहगड रोड व सहकारनगर परिसरातील चोरी व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून एक सोन्याची चेन,दोन दुचाकी गाडया, एक मोबाईल तसेच एक कोयता असा 1 लाख 82 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

आरोपीचा दिनांक १७/०६/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला आहे. वरील आरोपी हे अभिलेखावरील दरोडा, जबरी चोरी ,=वाहन चोरी, घरफोडी करणारे गुन्हेगार आहेत.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त.अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे , सहा. पोलीस आयुक्त  सुरेंद्रनाथ देशमुख व मा पो.निरी.  महेंद्र जगताप युनिट -२ गुन्हे शाखा पुणे शहर. यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरी. प्रकाश मोरे, सहा.पो.निरी. वैशाली भोसले,सहा.पोलीस फौजदार यशवंत आंब्रे, सलीम पठाण व पोलीस अमंलदार अस्लम पठाण, किशोर वग्गु, चेतन गोरे, उत्तम तारु, चंद्रकांत महाजन, निखील जाधव, समीर पटेल, गोपाळ मदने, व मपोशि अरुणा शिंदे यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.