पावसाळी पूर्व कामे उत्तमरित्या; उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आदेश
पुणे : पावसाळी कामांची शहरातील विविध भागातील पाहणी करण्यात येत असून दोन टप्प्यामधील पहिल्या टप्प्याची पाहणी आज पूर्ण झाली. त्यामध्ये जवळपास शहरातील वेगवेगळ्या भागातील नाले रुंदीकरण, खोलीकरण, कल्वर्ट वाढविण्याचे, सीमा भिंती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कामाची पाहणी आज करण्यात आली. यामध्ये संपूर्ण शहरातील धोकादायक ठिकाणांची पाहणी केली. गतवर्षी ज्या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साठले होते किंवा घरांमध्ये पाणी घुसले होते, काही नागरिकांना त्रास झाला होता. यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी आज करण्यात आली, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महापौर मोहोळ म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात पूर्व भागातील पाहणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे काम झालेले झाले आहे. सीमाभिंत, नाल्याची स्वच्छता, काही ठिकाणी ही कामे बाकी आहेत, अशा ठिकाणची कामे त्वरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यावेळी उपमहापौर सुनिता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार आणि विविध खात्यांच्या प्रमुखांसह प्रभागनिहाय उपस्थिती नगसेवक धीरज घाटे, सरस्वती शेंडगे, सचिन दोडके, अल्पना वर्पे, हर्षाली माथवड, राजाभाऊ बराटे, वृषाली चौधरी सुशील मेंगडे, हरिदास चरवड, मंजुषा नागपुरे, ज्योती गोसावी, श्रीकांत जगताप, दत्ता धनकवडे, मनिषा कदम, राजेंद्र शिळीमकर, मानसी देशपांडे, धीरज घाटे, वसते, रघुनाथ गौडा, अजय खेडेकर, मनिषा लडकत, अर्चना पाटील, रफिक शेख, स्मिता वस्ते, सदानंद शेट्टी, आरती कोंढरे, विजयालक्ष्मी हरिहर यांची होती.
पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घेऊन प्रशासनाला त्वरित उपाययोजना करून कामे मार्गी लावण्याची आदेश यावेळी महापौर मोहोळ यानी दिले आहेत.
इस्माईल बेकरी नाला परिसरात प्रवाहास अडथळा ठरणाऱ्या अनावश्यक स्टॉर्म वॉटर लाइन्स तोडून काढण्यात आल्या. वारजे येथील रमेश वांजळे चौकात रस्त्यावर पाणी साठून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हायवेवर जागोजागी स्लॅब काढून साफ करण्यात आले आहेत .तसेच नेहरू रस्त्यावर फर्निचर विक्रेते नाल्यात फर्निचर ठेवत असल्याने त्यांच्यावर पालिकेने कारवाई केली आहे .तसेच अरण्येश्वर परिसरातील पाण्याच्या प्रवाहाल अडथळा येत असलेली जलवाहिनी शिफ्ट करण्यात आली आहे .मित्र मंडळ चौकातील आंबील ओढया शेजारी साने गुरुजी वसाहत परिसरातील अतिृष्टीमुळे पडझड झालेल्या सीमा भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे .याशिवाय बंदिस्त माणिक नाला मशीनने व ओपन नाला जेसीबी मशीनने साफ करण्यात आला आहे. अशी माहिती महापौर मोहोळ यांनी यावेळी दिली.
महापौर मोहोळ पूढे म्हणाले, रास्ता पेठ आणि कात्रज परिसरातील नाले सफाई आणि पावसाळी कामांना वेग देण्यात आला आहे. माणिक नाला, पॉवर हाऊस हाऊस चौक, रस्ता पेठ भागातील बंदिस्त नाला हा ग्राब मशीन व मनुष्यबळने सफाई करण्यात आली आहे. तसेच राजस सोसायटी चौक, कात्रज येथील कल्व्हर्टची साफसफाई मनुष्यबळाने करण्यात आली आहे. सदर ठिकाण क्रिटिकल स्पॉट असल्याने याठिकाणी ठेकेदारमार्फत वारंवार स्वच्छ्ता करण्यात येत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!