भोर लॉकअप तोडून फरार झालेल्या मोक्का मधील दुसराही कुख्यात दरोडेखोर जेरबंद: पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

पुणे :  भोर लॉकअप तोडून फरार झालेल्या मोक्का मधील कुख्यात दरोडेखोरास पुणे ग्रामीण स्थनिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.प्रवीण प्रल्हाद राऊत (वय 29 रा.चिखली ता.इंदापूर जि. पुणे* याने पुणे,सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दरोडा,जबरी चोरी, घरपोडी, चोरी या सारखे 10 गंभीर गुन्हे असलेला आरोपी प्रवीण याने पुणे व सातारा जिल्ह्यात अनेक मोठे गुन्हे करून दहशत पसरवली होती.राजगड पोलीस स्टेशन हद्दीत कापूरहोळ या गावात पोलिसांचा वेष परिधान करून बालाजी ज्वेलर्स सोनार दुकानावर आपल्या साथीदारांसोबत दरोडा टाकून मोठ्या प्रमाणात सोने चांदी लुटून नेली होती. सदर गुन्हेगाराची वाढती दहशत तसेच गुन्ह्याचे प्रकार थांबवून त्यास त्वरित अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.

त्यानुसार सदर गुन्ह्यांचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की आरोपी प्रवीण राऊत हा चिखली या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेतले व पुढील तपास करण्याकामी राजगड पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले होते.त्यावेळी सदर टोळीतील आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 कलम 3(1)(¡¡) 3(4) प्रमाणे कारवाई करणार करण्यात आली होती

दि.17 फेब्रुवारी 2021 रोजी भोर लॉकअप या ठिकाणी पोलीस कस्टडीत असताना लॉकअपचा गज कापून पहाटे 5ते 6 च्या दरम्यान आरोपी चंद्रकांत लोखंडे व प्रवीण राऊत हे लॉकप मधून पळून गेले होते.

सदर ची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने पळून गेलेल्या आरोपीस ताबडतोब अटक करण्याच्या सूचना मा.पोलीस अधीक्षक सो यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर आरोपीचा तपास करण्याचे मोठे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेपुढे असताना दिनांक 15 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रकांत लोखंडे ला मोठ्या शितापीने खेड शिवापूर येथे पकडले होते .त्यानंतर आरोपी  प्रविण प्रल्हाद राऊत हा फरार होता .

आज बातमीदारामार्फत गोपनीय बातमी मिळाली की आरोपी प्रवीण  हा हॉटेल अरमा टाऊन हाऊस गोरेगाव वेस्ट ,मुंबई येथे असल्याची गोपनीय बतमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने रवाना होऊन सदर आरोपीला ताब्यात घेतले.त्याची झडती घेऊन त्यास ताब्यात घेतले असून त्याची वैदकीय तपासणी करून पुढील तपासासाठी भोर पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही डॉ. अभिनव देशमुख पोलिस अधीक्षक , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट,  पोसई अमोल गोरे, पो हवा ज्ञानेश्वर क्षीरसागर, पो.ना राजू मोमीन, पो कॉ अमोल शेडगे, पो कॉ बाळासाहेब खडके, पो कॉ मंगेश भगत, मपोकॉ पुमम गुंड,मपोकॉ सुजाता कदम, चालक पो हवा मुकुंद कदम यांनी केली आहे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.