नववर्षाच्या सुरवातीस पवना नदीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा गुन्ह्यातील आरोपीस अटक, वडगाव मावळ पोलिसांची मोठी कामगिरी

मावळ : मावळ तालुक्यातील आर्डव गावाच्या हद्दीत पवना नदीत एक जानेवारी 2021 रोजी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. तो प्रकार खुनाचा असून त्याचा सहा महिने तपास करून वडगाव मावळ पोलिसांनी मयताच्या खुनाच्या गुन्ह्यातील मयताची ओळख पटवून खुनाचा गुन्ह्यातील आरोपीस अटक केली आहे. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

आरिफ सिद्धीकी शेख (वय 25, रा.थेरगाव, काळेवाडी,.पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. किशोर दिनकर लोंढे (सध्या रा. काळेवाडी) असे खून झालेल्या.व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2021.रोजी मावळ तालुक्यातील आर्डव गावाच्या हद्दीत पवना नदीत २५ ते ३० वर्षाच्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मयताची ओळख पटविण्यापासून गुन्ह्याची उकल करण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते. सुरुवातीला पोलिसांनी पुणे ग्रामीण, पुणे शहर, पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांना तपास याद्या पाठवून तपास केला. मात्र कुठेही मयताच्या वर्णनाचे मिसिंग सापडले नाही.

पुणे शहरातील खडक पोलीस स्टेशन येथील मिसिंग मधील एक बेपत्ता व्यक्ती मयताच्या वर्णनाशी मिळता जुळता होता, त्यामुळे त्याच्या नातेवाईकांचे रक्त नमुने घेऊन DNA तपासणी साठी पाठविणेत आलेले होते, परंतु DNA अहवाल नकारात्मक आला त्यामुळे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील,सहा पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांचे मार्गदर्शनाखाली पुन्हा जोमाने तपास चालू केला.

त्यानंतर वडगाव पोलीसांनी पुणे शहर व पिंपरी चिंचवड मधील ४८ पोलीस स्टेशन मध्ये खास अंमलदार नेमून पुन्हा एकदा तपास याद्या व मयताचे फोटो पाठवून प्रत्येक पोलीस ठाण्यात मयताचे फोटो लावले होते.

२ जुन रोजी गुलटेकडी मार्केट यार्ड पोलीस स्टेशन मध्ये लावलेला मयताचा फोटो विजय शहाजी चव्हाण नावाचे चहा विक्रेत्याने ओळखला आणि तो फोटो किशोर दिनकर लोंढे याचा असून  तो  दीड वर्षा पासून थेरगाव, काळेवाडी मध्ये आपल्या बहिणीकडे राहत असल्याची माहिती दिली.

त्यानुसार पोलिसांनी मयताच्या बहिणीचा पत्ता निष्पन्न करून त्यांना मयताचे फोटो व चीजवस्तू दाखविल्या असता त्यांनी मयताच्या अंगठ्या, ताईत, व पॅन्ट ओळखले तसेच मयतास गांजा ओढण्याची व दारू पिण्याची सवय असल्याची माहिती देऊन, मयत व्यक्तीस घरातून न सांगता ३ ते ४ महिने कोठेही जायची सवय असल्याने त्यांनी किशोर च्या मिसिंग बाबत कोठेही खबर दिली नसल्याची माहिती पोलिसांना दिली.

मयत किशोर दिनकर लोंढे यास गांजा व दारू पिण्याची सवय असल्याने आम्ही त्याची नेहमी बसण्या उठण्याची ठिकाणे व गांजा ओढणारे मित्रांची नावे निष्पन्न करून थेरगाव काळेवाडी परिसरातील गांजा ओढणारे मुलांकडे चौकशी केली परंतु त्यातही पोलीसांच्या हाती काही लागले नाही.

दरम्यान, मयताचा मोबाईल क्रमांक निष्पन्न करून पोलिसांनी त्याचा सीडीआर काढला. पोलिसांनी CDR प्राप्त करून विश्लेषण केले असता मयताचे व एका संशयित मोबाईल फोनचे सतत संपर्क झाला असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तो नंबर कोणाचा आहे याचा तपास केला असता तो नंबर संगीता सांतराम दुबे (रा.थेरगाव काळेवाडी पुणे) या नावावर असल्याचे दिसून आले. त्याप्रमाणे त्या पत्त्यावर सदरच्या महिलेचा शोध घेतला असता सदरच्या पत्त्यावर ती महिला मिळून आली नाही, त्यामुळे संशयित मोबाईल फोन वरून संपर्क झालेल्या एका फोनची माहिती घेतली असता तो फोन पुणे शहरातील वडारवाडी परिसरातील जेल मधून सुटलेल्या एका गुन्हेगाराचा फोन असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी त्याच्याकडे जाऊन त्याचा फोन तपासला असता त्याच्या फोन मध्ये संशयित मोबाईल फोन आरिफ या नावाने सेव्ह असल्याचे तसेच मयताचा नंबर आरिफ2 असा सेव्ह असल्याचे दिसून आल्यावर त्याच्याकडे सदरचा व्यक्ती कोण आहे याबाबत माहिती विचारली असता त्याने या नंबर वरून त्याचा जेल मध्ये ओळख झालेला मित्र आरिफ सिद्धीक शेख याचा असल्याचे व आरिफला वाकड पोलिसांनी एका विनयभंगाच्या गुन्ह्यात फेब्रुवारी 2021 मध्ये अटक केली होती. दरम्यान त्याच्यावर बुलडाणा जिल्ह्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने बुलडाणा पोलिसांनी त्याला वाकड पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. वडगाव पोलिसांनी बुलडाणा पोलिसांशी संपर्क करून माहिती विचारली असता आरिफ शेख याने कास्टडी मध्ये असताना बोलता बोलता मी व माझ्या मित्रांनी पुण्यात एक खून केला आहे असे बोलला आल्याची माहिती दिली होती परंतु तेथील अधिकाऱ्यांनी खात्री करण्यासाठी वाकड पोलीस स्टेशन ला खुनाचा कोणता गुन्हा दाखल आहे का अशी माहिती विचारली. परंतु वाकड हद्दीत खुनाच्या गुन्ह्यातील कोणतेही प्रेत मिळालेले नसल्याने त्यांनी आरोपीने सांगितलेल्या माहिती कडे दुर्लक्ष केले होते. परंतु प्रस्तुत गुन्ह्यातील सर्व परिस्थिती पाहता गुन्हा आरिफ सिद्धीकी शेख यानेच केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र वडगाव पोलिसांनी वाकड, पुणे मार्गे बुलडाणा गाठून आरोपीला बेड्या ठोकल्या.

आरोपीने हा खून का केला, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. तसेच आरोपीच्या अन्य साथीदारांचा शोध वडगाव पोलीस घेत आहेत.

या गुन्ह्यातील विशेष बाब म्हणजे गुन्ह्यातील मयत किशोर दिनकर लोंढे  यास घरामध्ये कोणासही काही एक न सांगता कामासाठी दोन ते तीन महिने बाहेर जायची सवय आल्याने मयताच्या नातेवाईकांनी तो नेहमी प्रमाणे कोठे तरी कामासाठी गेला असावा असे समजून त्याची मिसिंग खबर दिलेली नव्हती त्यामुळे मयताची ओळख पटविणेस आव्हान होते असे असताना मयताची कोठेही मिसिंग खबर नसताना सुद्धा वडगाव पोलिसांनी अतिशय कौशल्याने मयत व्यक्तीची ओळख पटवून सुमारे ६ महिन्याने गुन्हा उघडकीस आणला आह

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.