दारू विक्रीचा बनावट परवाना देऊन ४० लाखांना घातला गंडा, आरोपी गजाआड
पुणे; दिल्ली येथे सहायक आयुक्तपदावर नोकरी करीत असल्याचा दावा करीत दारू विक्रीचा परवाना देतो, सांगून दारू विक्रीच्या बनावट परवान्याची व वाईन बारच्या बनावट लायसनची झेरॉक्स देऊन तब्बल ४० लाख ४३ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम दुर्गेश गौर (वय ३३) आणि रुजना गौर (वय २६, रा. फुरसुंगी, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत परमेश्वर बबनराव कुचेकर (वय ३३, रा. हॅपी कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १८ जानेवारी २०२० ते १० सप्टेंबर २०२० दरम्यान शिवाजीनगर कोर्ट पुणे व इतर ठिकाणी घडला. रुजनाने शुभम दिल्लीतील एनसीटी येथे सहायक आयुक्तपदावर काम करीत आहे, असे खोटे सांगून व बनावट आयकार्ड दाखवून कुचेकर यांचा विश्वास संपादन केला. प्रथम हडपसर या ठिकाणी नवीन सदनिका घेतली आहे, असे सांगून शिवाजीनगर कोर्ट पुणे या ठिकाणी समजुतीचा करारनामा करून कुचेकर यांच्याशी जवळीक साधली. नंतर त्यांच्याकडून वेळोवेळी रोखीने तसेच ऑनलाइन पद्धतीने ४० लाख ४३ हजार रुपये घेतले. त्या मोबदल्यात फिर्यादीला मेसर्स सयुरी वाईन्स अॅण्ड कंपनी नावाने दारू विक्री परवाना देतो, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीला दारू विक्रीच्या बनावट परवान्याची व वाईन बार लायसनची रंगीत झेरॉक्स देऊन फिर्यादीचे पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली.
फिर्यादी तर्फे एडवोकेट साजिद शाह यांनी कामकाज पाहिले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!