पुण्यात खाण्याचे आमिष दाखवून स्मशानभूमीत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

 

पुणे : पदपथावर राहणाऱ्य़ा अल्पवयीन मुलाला नाष्टा खायला देण्याच्या बहाण्याने त्याला दुचाकीवर बसून एका स्मशानभूमी परिसरात नेले. त्यानंतर त्याने अत्याचार करताना मुलाने विरोध केला. त्याचा राग आल्यामुळे सराईताने मुलीचा गळा दाबून केस ओढून जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.ही घटना पुण्यातील पूनावाला गार्डन येथील स्मशान भूमीत घडली आहे.

रवींद्र उर्फ  बल्ली कांबळे (वय-३२ वर्षे,रा.डायस प्लॉट गुलटेकडी,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी अल्पवयीन मुलगा स्वारगेट परिसरातील एका पदपथावर कुटूंबियासोबत राहते. त्याठिकाणी ये-जा करणाऱ्य़ा सराईत रवींद्र उर्फ  बल्लीसोबत अल्पवयीन मुलाची ओळख झाली. त्याच ओळखीचा गैरफायदा घेउन 15 जूनला सकाळी साडेनउच्या सुमारास रवींद्रने मुलाला नाष्टा खायला देण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून स्मशानभूमी परिसरात नेले.

त्याठिकाणी त्याने मुलावर  लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने विरोध केला. तेव्हा नराधम बल्लीने त्याचा गळा दाबून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘ तू जर मी सांगतो तसे केले नाही तर मी तुला जिवंत मारून स्मशानभूमीतच पुरून टाकीन’ अशी धमकी दिली. याबाबत आरोपीविरुद्ध स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास स्वारगेट पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक डी. एस. जमदाडे करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.