मी एकटा मुंबईला जाणार नाही, चर्चेसाठी कोण आणि कधी जाणार, हे मराठा समन्वयक ठरवतील- संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली होती. 6 जून रोजी रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. येत्या 16 जूनपासून कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले होते. आज सकाळी 11 वाजता शाहू महाराजांच्या समाधी स्थळी या आंदोलनाला सुरुवात झाली होती.खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले.

आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘ राज्य सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे, त्याचं स्वागत आहे. पण मी एकटा चर्चेला जाणार नाही. पण मी चर्चेसाठी एकटा जाणार नाही.मराठा समन्यवक ठरवतील चर्चेसाठी कोण-कोण जाणार आहे, त्यानंतर चर्चेसाठी जाण्याबद्दल निर्णय घेऊ’, असं खासदार संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले. आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला आहे.

‘आपण अनेक पर्याय त्यांना दिले होते. पण, त्याबद्दल फारसं कुणी बोललं नाही. आमचा सर्वांचा अभ्यास झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि इतर मंत्री आपल्या भेटीसाठी तयार आहे. त्यांनी आपल्यासाठी चर्चेसाठी दारं उघडली आहे ही आपल्यासाठी चांगली बाब आहे’ असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

‘पण मी चर्चेसाठी एकटा जाणार नाही. अजित पवार यांनी याआधी सुद्धा मला 4 जून रोजी फोन केला होता. की आपण मुंबईमध्ये भेटू. पण मी त्यांना सांगितलं. आम्ही आमच्या आमच्या मागण्या मांडल्या आहे. मी एकटा तुम्हाला कशाला भेटू. उद्या कुणी म्हटलं ही सगळं काही मॅनेज झालं तर काय करायचं. त्यामुळे मी ठरवलं आहे, भेटायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री असले पाहिजे आणि सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्यवक पाहिजे, त्यावेळी चर्चा होऊ शकते’ असा खुलासाही संभाजीराजेंनी केला.

‘ नऊ दिवस झाले काही निर्णय घेतला नाही, त्यामुळे आज आंदोलन करावे लागले. आम्ही त्यांच्या चर्चेचं स्वागत करतो. मराठा समाजासाठी आमच्या मागण्या मान्य करत असतील, लावून धरत असतील तर ते चांगलंच आहे. आम्ही सुद्धा माणसं आहोत, विषय ताणून धरणाच्या आमचा विचार नाही. पण, मी एकटा भेटायला जाणार नाही. मराठा समन्यवकांनी ठरवावं, कोण-कोण चर्चेला येणार आहे, तुम्ही ठरवावं, आपण मार्ग काढूया’ असंही संभाजीराजे म्हणाले.

समाजाला वेठीस धरायचे नाही


ते पुढ म्हणाले की, लाँग मार्च काढण्याचा हा आपला शेवटचा पर्याय आहे. मी पहिल्याच दिवशी स्पष्ट केले आहे की, समाजाला वेठीस धरायचे नाही. आरक्षण हा वेगळा लढा आहे, तो सुरूच राहणार आहे. त्यात घटनादुरुस्ती असेल किंवा काही बदल असतील तर ते त्यांनी करावे. पण, आमच्या इतर ज्या मागण्या आहे, त्या जर मान्य करत नसतील तर कोणताही मार्ग काढत नसतील तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही. जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने मार्ग काढला तर आम्ही स्वागत करू, असेही ते म्हणाले.

“आपण उद्याच मुंबईला चला, मी मुख्यमंत्र्यांची भेट करुन देतो”; सतेज पाटलांचं संभाजीराजेंना आवाहन

“संभाजीराजे यांनी मांडलेल्या मागण्यांसाठी राज्य सरकार १०० टक्के सकारात्मक आहे हे मला सांगायचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दिलीप वळसे पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात या सर्वांना आपल्याशी चर्चा करुन मार्ग कसा काढता येईल यासंबंधी चर्चा करायची आहे. सरकारला एक पाऊल पुढे टाकून सकारात्मक भूमिका घेतली आहे हे सांगायचं आहे. त्यामुळे राज्य शासन स्तरावरील विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण उद्या मुंबईला यावं, मुख्यमंत्री चर्चा करण्यासाठी तयार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अशोक चव्हाण आपली भेट घेतील. राज्य सरकार सकारात्मक असून तुमच्या भूमिकेला अनुसरुनच सरकारची भूमिका आहे, त्यामुळे आपण उद्याची वेळ देऊन मुंबईला यावं,”अशी विनंती सतेज पाटील यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.