पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला अटक ;एक पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी चिंचवड :पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला आरोपी जिल्ह्याच्या हद्दीत कुठल्याही परवानगी शिवाय आला. त्यामुळे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने त्याला अटक करून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई मंगळवारी (दि. 15) रात्री घोलप कॉलेज जवळ सांगवी येथे करण्यात आली.

मच्छिंद्र हरिकिसन वरकटे (वय 32, रा. इंद्रपरी कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार शैलेश मगर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपी मच्छिंद्र याला 31 ऑक्टोबर 2020 रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तरीही आरोपी स्वप्नील शासनाची कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. आरोपी सांगवी येथील घोलप कॉलेज जवळ आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी मच्छिंद्र वरखडे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी 40 हजार 600 रुपये किमतीचा हा शस्त्रसाठा जप्त करत आरोपीला अटक केली.खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.