म्युकर मायकोसीस या आजारावरील औषधे काळयाबाजाराने विकणा-या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, वाकडं पोलिसांची कामगिरी

 

पिंपरी चिंचवड : म्युकर मायकोसीस या आजारावरील औषधे काळयाबाजाराने विकणा-या आंतरराज्यीय टोळीतील आरोपींना  वाकड पोलीसांनी अटक केली आहे. या आधी या टोळीतील ५ जणांना गुंडाविरोधी पथकाने अटक केली होती.त्याच्याकडून ८४ हजार रूपये किमतीचे १४ Liposomal Amphotericin B Injection व ६० रुपये किंमतीचे ८ Amphotericin B Liposom for Injection असा एकूण १ लाख ४४ हजार रूपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

शरणबसवेश्वर सिध्देश्वर ढमामे (वय ३८ वर्षे धंदा एम.आर. रा. घरनं. ०३ ब सोनामाता नगर विजापुर रोड सोलापुर) व राजशेखर कासाप्पा भजंञी (वय ३३ वर्षे, धंदा नोकरी, रा. पीएनटी हाउसिंग बोर्ड कॉलनी,दवेता मंदिर शेजारी, ता. जि. गुलबर्गा कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी गुंडाविरोधी पथकाने म्युकर मायोसीस या आजारावरील औषधे काळयाबाजाराने विकणा-या ५ आरोपींना अटक केली होती.त्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास करून शरणबसवेश्वर सिद्धेश्वर ढमामे याचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला सोलापूर येथून अटक केली.

त्याच्याकडे पोलीसांनी तपास केला असता सदर इंजेक्शनची विक्री गुलबर्गा येथुन होत असलेची माहिती प्राप्त केली. सदर माहितीचे आधारे आरोपीस ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करुन गुलबर्गा कर्नाटक येथुन सदर इंजेक्शनची विक्री करणारा आरोपी राजशेखर कासाप्पा भजंञी कर्नाटक यास गुलबर्गा येथुन सापळा लावुन ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ८४ हजार रूपये किमतीचे १४ Liposomal Amphotericin B Injection व ६० रुपये किंमतीचे ८ Amphotericin B Liposom for Injection असा एकूण १ लाख ४४ हजार रूपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी राजशेखर कासाप्पा मजंत्री गुलबर्गा इन्स्टस्टुट ऑफ मेडीकल सायन्स, गुलबर्गा या शासकिय रुग्णालयात कोवीड तसेच म्युकर मायकोसीस विभागात नर्सिंग स्टाफ आहे. सदर गुन्हयात मेडीकल कॉलेजमधील आणखी कोणाचा सहभाग आहे त्याचप्रमाणे यातील आरोपीत यांनी सोलापुर येथे काही इंजेक्शन विकल्याची माहिती मिळाली असुन याबाबत पुढील तपास पो.उप. निरीक्षक दिपक कादबाने करित आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे , सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सहा. पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे -१ संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे -२   सुनिल टोणपे, सपोनिरी हरिष माने-गुंडा विरोधी पथक, वाकड पो. स्टे. चे पोउपनिरी दिपक कादबाने, पो.हवा. जावेद पठाण, पो.हवा. विकास खुटवड, पो.शि. गोरखनाथ कामडे यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.