मोक्कातील फरारी आरोपीला अटक ,पुणे ग्रामीणच्या LCB ची कामगिरी

पुणे : महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याची (मोक्का) कारवाई केलेल्या गुन्ह्यात दोन वर्षापासून फरार असलेल्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे

अमोल पोपट कसबे (वय २६, रा देसाई इस्टेट , कॅनॉल जवळ बारामती ता बारामती जि पुणे साध्य रा उरुळी देवाची गाव ता हवेली जि पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मार्च २०१९ रोजी सूपा घाटातील पहिले वळणावर रात्री एक ट्रान्सपोर्ट चा ट्रक ३१ टन वजनाचे गहू घेऊन जात असताना सदरच्या ट्रकला एका कारने आडवी मारून त्या ट्रकला थांबवून सदरचा ट्रक आणि त्याचा ड्रायव्हर ला मारहाण करीत सआरोपी यांनी दरोडा टाकला होता . सदर २९६/२०१९ भा द वी का कलम ३९५,३६३ (मोक्का)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरच्या गुन्ह्यात एकूण १० आरोपींची नावे समोर आली होती त्यातील 9 आरोपी यांना काही दिवसातच अटक करण्यात आली होती परंतु एक आरोपी आज पर्यत गेली २ वर्षा पासून फरार होता . आज दि. १७ जून रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी अमोल हा एका हॉटेल मध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी उरुळी देवाची गावात प्रवेश करणाऱ्या रोडच्या डावी कडे असणारे हॉटेल समोर त्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने त्याने वरील गुन्ह्या त्याचे मित्रांसोबत केल्याचे सांगत आहे. यावरून पाहिजे फरारी आरोपी यादी क्र १२११ नुसार त्याचे नाव देखील होते . यावरून सदर आरोपीस वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी यवत पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे .

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख ,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, दौड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट , पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पो हवा अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे, पो ना विजय कांचन, पो ना राजू मोमिन,  पो कॉ धिरज जाधव, पो कॉ अमोल शेडगे, पो कॉ मंगेश भगत,  पो कॉ दगडू विरकर , म पो कॉ पूनम गुंड यांनी केली आहे .

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.