वाहन चोऱ्या करणाऱ्या चोरास विश्रामबाग पोलिसांकडून अटक

पुणे : वाहन चोऱ्या करणाऱ्या चोरास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 3 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.त्याच्याकडून 3 दुचाकी असा एकूण 1 लाख 20 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दत्ता वामनराव निकम (वय 21, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरीचे गुन्हे घडू नयेत याअनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाण्याचे तपास पथक हददीत गस्त घालत होते. यादरम्यान गस्त घालत असताना त्यांना येथील राजेंद्रनगर परिसरातील तेंडुलकर गार्डनजवळ एकजण नंबर प्लेट नसलेली गाडी घेऊन जात असताना दिसून आला. त्याला पकडले व दुचाकी घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने ही दुचाकी कुमठेकर रस्त्यावरून चोरली असल्याचे कबुली दिली. यानंतर सखोल तपासत त्याच्याकडून 3 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून 3 दुचाकी असा एकूण 1 लाख 20 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग,पुणे शहर डॉ.संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ श्रीमती.प्रियंका नारनवरे, पोलीस उप आयुक्त,परिमंडळ-२ सागर पाटील,  सहायक पोलीस आयुक्त,विश्रामबाग विभाग, बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस स्टेशन,विजय टिकोळे, पोलीस निरीक्षक गुन्हे,कुंडलिक कायगुडे, तपास पथकाचे प्रभारी
अधिकारी पोलीस उप-निरीक्षक,राकेश सरडे, पोउनि.गणेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार संजय दगडे, बाबासाहेब दांगडे, धीरज पवार, विठठल खिलारे, हेमंत पालांडे, प्रशांत शिंदे, सात्ताप्पा पाटील, अभिजीत गोंजारी,सर्व नेमणुक विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.