‘तू माझ्या घरात का राहते ‘ असे म्हणून सुनेवर सुरीने सपासप वार ; सासऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड : ‘तू माझ्या घरात का राहते’ असे म्हणून घराच्या टेरेसवर कपडे वाळत घालत असलेल्या सुनेवर सासऱ्याने सुरीने सपासप वार करुन खुनी हल्ला केला. याबाबत सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दि. 16 सकाळी खेड तालुक्यातील भाम वाकी येथे संतोषनगर मध्ये घडली.
पुरुषोत्तम दगडू येवले (वय 75, रा.संतोषनगर, भाम वाकी, ता.खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. याबाबत 35 वर्षीय सुनेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला त्यांच्या घराच्या टेरेसवर कपडे वाळत घालत होत्या. त्यावेळी आरोपी सासरा लोखंडी सुरी घेऊन तिथे आला. सासऱ्याने फिर्यादी महिलेला ‘तू माझ्या घरात राहते
काय’ असे म्हणून मानेला आणि केसांना पकडून मागे फिरवले. त्यानंतर ‘तुला जीवे मारतो. तुला खलास करतो’, असे म्हणून जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी महिलेच्या हाताच्या मनगटावर, पंजावर सुरीने सपासप वार केले.फिर्यादी महिला ओरडून खाली बसल्या असता आरोपीने फिर्यादी यांच्या डोक्यात, कपाळावर, गालावर, छातीवर, हाताच्या पोटरीवर वार करून गंभीर जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!