पत्नी आणि मुलाचा खुनाचा संशय असणाऱ्या पतीची आत्महत्या; खानापूरजवळ नदीच्या पाण्यात सापडला मृतदेह

पुणे: पुण्यातील धानोरी परिसरात राहणाऱ्या महिलेसह तिच्या सहा वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर आता या बेपत्ता असलेल्या पतीचा मृतदेह पोलिसांना खानापूर येथे आढळून आलाय. सासवड आणि कात्रच्या नवीन बोगद्याजवळ बुधवारी माय लेकांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलीस आबिद शेखच्या मागावर असतानाच त्याचा मृतदेह आढळून आल्याने या प्रकरणातील गूढ आणखीन वाढलं आहे.

आबिद अब्दुल शेख (वय ३८) याचा आज सकाळी खानापूर येथे नदीच्या पाण्यात मृतदेह आढळून आला आहे. खडकवासला धरणाच्या पुढे खानापूर येथे एक मृतदेह आढळून आला. तपास करता गेले काही दिवस पुणे व ग्रामीण पोलीस ज्यांचा शोध घेत होते. त्या आबिद शेख यांचा तो मृतदेह असल्याचे लक्षात आले. हवेली पोलीस आणि भारती विद्यापीठ पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

धानोरी परिसरात वास्तव्यास असलेल्या आबिद शेख याने मायलेकराचा निर्घुण खून करुन त्यांचे मृतदेह सासवड व कात्रज घाटात वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते. दुहेरी खुन प्रकरणातील पतीवर पोलिसांचा सर्व तपास केंद्रीत झाला करण्यात आला होता. त्यानेच दोघांचा खुन करुन स्वत: पसार झाल्याचे आतापर्यंतच्या तपासावरुन निष्पन्न होत होते. त्यामुळे आबिद शेख याचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत होता.

सातारा रोडवर भाड्याने घेतलेली कार पार्क करुन रस्ता ओलांडून जात असताना तेथील सीसीटीव्हीमध्ये अबिद शेख कैद झाला होता.  तेथून तो कोठे निघून गेला, याचा शोध सुरु होता. याप्रकरणी सासवड व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयान शेख (वय ६) आणि आलिया शेख (वय ३५) असे खुन झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. मध्य प्रदेशाहून बुधवारी त्यांचे नातेवाईक आले आहेत. त्यांनी मायलेकरांवर काल अंत्यसंस्कार केले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.