पुण्यात राष्ट्रवादी नगरसेविकेच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत मागितली खंडणी, एकाला अटक
पुणे : गुंडाने ठार मारण्याची सुपारी दिली असल्याची धमकी देऊन कोंढवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या मुलाकडे 40 हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईताला पुण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 1 ने कर्जत मधून अटक केली आहे.. त्याने मुलाचा जस्ट डायलवरून मोबाईल क्रमांक मिळवला होता.
सचिन मारुती शिंदे (वय 32, रा. कर्जत) असे अटक केलेल्याचे नाव आहे.याप्रकरणी युवराज नारायण लोणकर यानी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका नंदा नारायण लोणकर यांचा मुलगा युवराज याला काही दिवसांपूर्वी आरोपी सचिन याने फोन केला व म्हणाला तुला ठार मारण्याची एका गुंडाने साडे सहा लाख रुपयांची सुपारी दिली आहे.तू जर मला 40 हजार रुपये दिले नाही तर मी तुला मारेल अशी धमकी दिली
याबाबत युवराज यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती.
त्याची चौकशी खंडणी विरोधी पथकाने सुरू केल्यानंतर तांत्रिक विश्लेषण केले. त्यावेळी हा फोन सचिन शिंदे याने केला असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार त्याला सापळा लावून पकडण्यात आले.चौकशी केली असता त्याला पैश्यांची चणचण भासात होती. त्यामुळे त्याने जस्ट डायलवरून युवराज यांना फोन केला. त्यानंतर त्याने फोनकरून खंडणी मागितली. सचिन हा हडपसर परिसरात राहण्यास होता. त्यामुळे त्याला सर्व माहिती आहे. याप्रकारानंतर तो कर्जतला निघून गेला आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, कर्मचारी पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौन्दर, रवींद्र फुलपगारे, राजेंद्र लांडगे यांच्या पथकाने केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!