पुण्यात शनिवार-रविवार सर्व दुकाने, मॉल, सलून बंद राहणार ;22 जूनपासून काय सुरु, काय बंद? वाचा सविस्तर
पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत दिली आहे.अनलॉकनंतर अनेक व्यापार्यांमध्ये शनिवार आणि रविवार दुकाने उघडली राहण्यास परवानगी आहे की नाही याबाबत संभ्रम होता.
पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
शनिवार-रविवार सर्व दुकानं, मॉल, सलून बंद राहणार !
पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 18, 2021
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.मात्र, तिसर्या लाटेच्या पार्श्वभुमीवर खबरदारी घेणे गरजेचे आहे.पुण्यात अनलॉक करताना प्रशासनाने सर्वच बाबी स्पष्ट केल्या होत्या.
येेेत्या सोमवार (दि.२२) पासून या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नवीन नियमावलीनुसार पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार असून मॅाल, मल्टिप्लेक्स सिनेमागृह आणि थिएटर हे मात्र बंद असणार आहे. शहरातील विकेंड लॉकडाऊन मात्र कायम ठेवण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे.
अशी आहे नवीन नियमावली…
1. अत्यावश्यक सेवेची दुकाने आठवडयातील सर्व दिवस सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील.
2. रेस्टॉरंंट, बार, फुड कोर्ट हे शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवेकरिता रात्री ११ पर्यंत सुरू राहतील.
3. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरूस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाजी विक्री करणारे दुकाने / गाळे हे आठवडयातील सर्व दिवस सुरू राहतील.
4. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवारी पुर्णपणे बंद राहतील.
5. उद्याने सकाळी ५ ते ९ व संध्याकाळी ४ ते ७
6. Outdoor स्पोर्ट्स ,क्रीडांगणे सकाळी ५ ते ९ , संध्याकाळी ५ ते ७
7. अभ्यासिका, वाचनालये ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ७ पर्यंत
8. राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक कार्यक्रम ५० लोकांसह संध्याकाळी ७ पर्यंत परवानगी
9. लेव्हल 5 असलेल्या ठिकाणी जायचं तर ई पास आवश्यक* शासकीय कार्यलये १०० टक्के क्षमतेने सूूरु
10. खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!