शिक्षण विभागाचा मोठा निर्णय,आता दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणार तोही दाखल्याशिवाय

मुंबई; ज्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळात आपली आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे खासगी संस्थांमधून अनुदानित किंवा शासकीय संस्थेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला असेल,त्यांच्यासाठी शिक्षण विभागाने एक महत्वाचा निर्णय जारी केला आहे.

जर एका शाळेतून दुसऱ्या शाळेत नववी, दहावीत एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा असेल तर तो शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय (टीसी) मिळू शकेल. विद्यार्थ्यांच्या आधीच्या संबंधित शैक्षणिक संस्थेने शाळा सोडल्याचा दाखला देण्यास अडवणूक केली किंवा दिला नाही तरी त्या विद्यार्थ्याला त्याच्या वयानुसार दुसऱ्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेता येईल. यासाठी विद्यार्थ्यांचे जन्माचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य मानावे, असे या निर्णयात नमूद केले आहे.

ज्या शैक्षणिक संस्था किंवा शाळा विद्यार्थ्यांना (टीसी) दाखल्याशिवाय प्रवेश नाकारल्याने एखाद्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले ते वाया गेले तर अशा शाळेवर आणि तेथील मुख्याध्यापकांवर कडक कारवाईचा इशारा ही शिक्षण विभागाने दिला आहे.

विद्यार्थी शाळाबाह्य झाल्यास किंवा शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित शाळा मुख्याध्यापकांवर कारवाईचा इशारा आल्यामुळे ज्या संस्था विद्यार्थ्यांची प्रवेश अडवणूक करण्याचा प्रयत्नात असतील त्यांनाही मोठा धडा मिळेल.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.