कारच्या धडकेत आई वडिलासह मुलाचा दुर्दैवी मृत्यू

जुन्नर : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि १८) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर जांबुत फाटा येथे घडली.

राजेश निवृत्ती लेंडे (वय ३८), सुरेखा राजेश लेंडे (वय ३३), यश राजेश लेंडे (वय १२) अशी अपघातात मृत्यू झालेल्या एकाच कुटुंबातील तिघांची नावे आहेत. या प्रकरणी मोटारकार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील भटकळवाडी शिवारातील राजेश निवृत्ती लेंडे हे पत्नी सुरेखा व मुलगा यश यांना घेऊन नारायणगाव येथे कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. नारायणगावाहून कपडे खरेदी करुन ते परतत असताना जांबुत फाट्याजवळ येडगाव (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत एका माॅलजवळ त्यांच्या त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीने (एमएच १४ जीएच २२०६) मागून धडक दिली.हा अपघात एवढा भीषण होता. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर मोटारही महामार्गावर दोन तीन पलट्या खाऊन उलटली. यात मोटारीचा चक्काचुर झाला. या घटनेत कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. मात्र, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे भटकळवाडी गावावर शोककळा कोसळली. या प्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.