प्लॉट विकसित करुन देण्याचे आमिष दाखवून 30 गुंतवणुकदारांची तब्बल 4 कोटींची फसवणूक
पुणे : वुड काऊंटी प्रोजेक्टमध्ये पाणी, लाईट, डेव्हलप रोड आदि सुविधा देण्याचे आमिष दाखवून तब्बल ३० गुंतवणुकदारांची ४ कोटी १६ लाख २० हजार ८६२ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०१४ ते २०१६ मध्ये हवेली तालुक्यातील कशाळ गावात घडला होता़.
योगेश बाबुराव कैकाडे (वय ५७) आणि सुजय बाबुराव कैकाडे (वय ५१, दोघे रा. नागपूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी आदित्य संजय कानिटकर यांनी फिर्याद दिली आहे़.
मिळालेल्या माहितीनुसार,लँडसर रिअॅलिटी कंपनीचे कार्यालय शिवाजीनगर येथे आहे.योगेश व सुजय कैकाडे हे लँडसर रिअॅलिटी कंपनीचे भागीदार आहेत.त्यानी हवेली तालुक्यातील कशाळ येथील वुड काऊंटी प्रोजेक्टमध्ये पाणी, लाईट, डेव्हलप रोड इत्यादी सुविधा तसेच सागाची झाडे लावून देऊ, असे आश्वासन दिले.
त्यांच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन सर्व प्रोजेक्ट दिलेल्या मुदतीत पूर्ण करु, असे आश्वासन देऊन करारनामा व अलोटमेंट लेटरमध्ये उल्लेख केला.त्या सर्व सुविधांसही पूर्ण करुन ताबा देऊ असा विश्वास दिला फिर्यादी व इतर ३० गुंतवणुकदरांकडून ३ लाख ९२ हजार ४० स्क्वेअर फुट क्षेत्रासाठी ४ कोटी १६ लाख २० हजार ८३२ रुपये स्विकारले.या जमिनीवर दिखाव्यापूर्ती डेव्हलपमेंट दाखविली.सर्व गुंतवणुकदारांना करारनाम्याप्रमाणे सुविधा न देता निव्वळ जमिनीचे खरेदीखत करुन देऊन गुंतवणुकदारांना प्लॉटचे डिमार्केशन करुन न देता तसेच जमीन दाखविली नाही.काहींना ताबा न देता गुंतवणुकदारांची ४ कोटी १६ लाख २० हजार ८६२ रुपयांची फसवणूक केली आहे. फिर्यादींच्या तक्रार अर्जानंतर पोलीस उपायुक्तांच्या परवानगीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!