बेकायदेशिररित्या  हत्यारे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, 5 लोखंडी कोयते जप्त

पुणे  : बेकायदेशिररित्या हत्यारे बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलीसांनी अटक  केली आहे. त्याच्याकडून 5 लोखंडी कोयते जप्त केले आहेत. प्रशांत विश्वास डोंगरे (वय 19 वर्ष रा. 337/954 विटकर बंगलो, पांडवनगर पुणे), असे अटक आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमलदार सचिन जाधव व दत्ता सोनवणे यांना रेकॉर्डवरिल गुन्हेगार प्रशांत डोंगरे हा हत्यारे घेऊन विटकर बंगला, पांडवनगर येथे उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार युनिट एकच्या पथकाने घटनास्थळी जावून खात्री करीत आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याजवळील पिशवीची झडती घेतली असता त्यात एकूण 5 लोखंडी कोयते आढळून आले. त्यामुळे त्याच्याविरोधात चतुर्शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पुढील कारवाईसाठी त्याला चतुर्शृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अमलदार सचिन जाधव, दत्ता सोनवणे, अशोक माने, आयाज दाद्दिकर, शशीकांत दरेकर व महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.