महिलेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीला अटक ; देहूरोड परिसरातील घटना

पिंपरी चिंचवड :  अंघोळ करत असतानाचा नग्न व्हिडिओ काढून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. याप्रकरणी देहूरोड पोलीसांनी 40 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.देहूरोड परिसरात हा प्रकार घडला आहे.

अजय विजय मोहिते (वय 40, रा. विकासनगर, देहूरोड) याला अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि.18) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेचा अंघोळ करत असताना चोरून नग्न व्हिडीओ काढत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. त्यामुळे आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 354 (क) अंतर्गत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.