लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करत जातीचे कारण सांगून लग्नास नकार देणाऱ्याला चाकण पोलिसांनी केली अटक

पिंपरी  चिंचवड: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर प्रत्यक्ष लग्नाची विचारणा केल्यावर तिला तु खालच्या जातीची असल्याचे सांगून नकार देणार्‍याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार चाकण परिसरात जून २००९ पासून १६ मे २०२१ दरम्यान घडला आहे.

संतोष रामदास शिवेकर (वय २९, रा. करंजविहिरे, ता. खेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.  याप्रकरणी एका पिडीत महिलेने चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी या मागासवर्गीय असल्याचे आरोपी संतोष शिवेकर याला माहिती होते. असे असताना त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर राहत्या घरी तसेच चाकण, खेड येथील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्या मर्जीविरुद्ध तिच्यावर लेंगिक अत्याचार केले.त्यानंतर तिने लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने ती खालीच्या जातीची असल्यामुळे त्यांच्याशी लग्नास नकार दिला. शेवटी तिने चाकण पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या खाली गुन्हा दाखल करुन संतोष शिवेकर याला अटक केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.