हृदयद्रावक! ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे 17 वर्षीय विद्यार्थिनिची आत्महत्या, नांदेडमधील घटना
नांदेड : ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल उपलब्ध न झाल्याने नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील मजुराच्या 17 वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी घरच्यांकडे मोबाइलची मागणी करूनही मोबाइल न मिळल्याने अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे.बिद्धशीला पोटफोडे (वय 17) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुद्धशीला सध्या अकरावीच्या वर्गात शिकत होती. तिला दहावीला 75 टक्के गुण मिळाले होते. बारावीतही चांगले गुण मिळवण्याचा तिचा मानस होता.त्यामुळे बारावीच्या परीक्षेतही चांगले गुण मिळवण्यासाठी तिला अभ्यासात मागं पडायचं नव्हतं. त्यामुळे तिनं आपल्या आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी करत होती. घराच्यांनीही तिला लवकरात लवकर मोबाईल घेऊन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्यास शिक्षण थांबेल, या नैराश्यातून या विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!